गडचिरोलीत मटणाच्या पार्टीसाठी बलात्कारी मोकाट

बलात्कार, जातपंचायत आणि जातीच्या ठेकेदारांचं हे भयाण वास्तव दुसरं-तिसरं कुठे नाही, तर याच पुरोगामीपणाचा तोरा मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील आहे.

गडचिरोलीत मटणाच्या पार्टीसाठी बलात्कारी मोकाट

गडचिरोली : पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. गडचिरोलीच्या मोहर्ली गावात चक्क एका मटणाच्या पार्टीसाठी बलात्काराची घटना दाबण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

17 जानेवारीला पाचवीतील चिमुरडीवर बलात्कार घडतो. स्वत:ला आई-वडील म्हणवणारे नराधम पोलिसात न जाता जात पंचायतीकडे धाव घेतात. न्यायाचा ठेका घेतलेली जात पंचायत चक्क मटणाची पार्टी आणि 12 हजार रुपयांच्या दंडावर मांडवली करते. यानंतर जातीचे ठेकेदार मटणावर तावही मारतात. मात्र जेव्हा बलात्कारी दंडाची रक्कम भरत नाही, तेव्हा कर्मदरिद्री पालक पुन्हा जात पंचायतीचा धावा करतात. मात्र जातपंचायत हात वर करते आणि अखेर पीडित मुलीच्या नशिबानं प्रकरण पोलिसात जातं आणि तक्रार दाखल होते आणि प्रकरणाला वाचा फुटते.

बलात्कार, जातपंचायत आणि जातीच्या ठेकेदारांचं हे भयाण वास्तव दुसरं-तिसरं कुठे नाही, तर याच पुरोगामीपणाचा तोरा मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील आहे.

दरम्यान, 24 जानेवारीला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 व्या शतकातही जर अशा घटना घडत असतील तर कुठे आहे महिला सबलीकरण आणि कशासाठी आहे बेटी बचावचा टाहो हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

VIDEO : पाहा या प्रकरणाचा स्पेशल रिपोर्ट :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jat Panchayat demands mutton party from Rape accused for so called justice
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV