नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या

नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या

नागपूर : नागपूरला उपराजधानी म्हणायचं की क्राईम सिटी असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. कारण की, नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज (रविवार) नागपूर-उमरेड रस्त्यावर आजी उषा कांबळे आणि त्यांची नात राशी कांबळे यांचं प्रेत सापडलं. या दोघी काल संध्याकाळापासून बेपत्ता होत्या. या घटनेमागं घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-उमरेड रस्त्यावरील संजूबा हायस्कूलच्या मागील नाल्यात उषा कांबळे आणि त्यांची नात राशी कांबळे यांचे मृतदेह गोणीत भरुन फेकण्यात आले होते. यावेळी उषा कांबळे यांचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

दरम्यान, एका पत्रकाराच्या कुटुंबाला असं संपवलं जात असताना पोलीस मात्र फक्त बघ्याच्याच भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेकडं लक्ष देणं गरजेचं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: journalist’s mother and daughter’s murder in Nagpur latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV