ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद

एकीकडे बारावीची परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा सुरु आहेत. मात्र शिक्षकांनी पुकारलेल्या बंदमुळे या सराव परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी आणि पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे.

ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद

मुंबई : राज्यभरात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून संपूर्ण राज्यभर कॉलेज बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. शिक्षकांच्या आजच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहिली आहेत.

एकीकडे बारावीची परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा सुरु आहेत. मात्र शिक्षकांनी पुकारलेल्या बंदमुळे या सराव परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी आणि पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे.

चौथ्य़ा टप्प्यातील आंदोलनात सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईत आझाद मैदानात जेलभरो करण्यात येणार आहे. तसंच मागण्या मान्य न झाल्यास बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या काळातही बहिष्कार आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत

  1. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.  1. 2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.  1. सर्व शिक्षकांना 24 वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.  1. कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे.  1. माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.  1. 2003 ते 201-11 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.  1. सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.  1. या व इतर 32 मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: junior college teachers protest all over state latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV