लग्नाच्या अवघ्या काही दिवसआधी तरुणीची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यातील रोहणी गावात एका 21 वर्षीय मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या करतानाचा व्हिडीओ देखील शूट केला आहे.

लग्नाच्या अवघ्या काही दिवसआधी तरुणीची आत्महत्या

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रोहणी गावात एका 21 वर्षीय मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या करतानाचा व्हिडीओ देखील शूट केला आहे. निशा कावळे असं मृत मुलीचं नाव आहे.

निशाचा नुकताच साखरपुडाही झाला होता. दरम्यान, निशाचा प्रियकर निखिल बोरकर याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप निशाच्या कुटुंबीयांनी केला आहे. निशा आणि निखिल बोरकरमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, निखिल लग्नासाठी टाळाटाळ करत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी  दुसऱ्या मुलासोबत तिचा विवाह ठरवला होता. 31 डिसेंबर रोजी तिचा साखरपुडाही झाला होता.

येत्या 4 फेब्रुवारी रोजी निशाचं लग्नही होणार होतं. मात्र त्याआधीच निशाने काल (मंगळवार) विषप्राशन करुन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Just a few days before the wedding the girl’s committed suicide latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV