जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस

लोया यांचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.

जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस

नागपूर : न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर नागपूर पोलिसांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. न्या. लोया यांचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.

लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडे होता. त्यामध्ये हा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं निष्पन्न झाले असून त्या संदर्भात नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे.

लोया यांच्या मृत्यू प्रकरण तपासावर नागपूर पोलीस काय म्हणाले?

  • लोया यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना त्यांचे डॉ. प्रशांत राठी यांनी दिली.

  • 1 डिसेंबर 2014 रोजी पहाटे 4 वाजता न्या. लोया यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे ईसीजी केलं, त्यात त्यांना हृदयविकार असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मेडिट्रीना रुग्णालयात नेण्यात आलं.

  • तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं.

  • शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात कोरोनरीच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

  • त्यानंतर लोया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने लातूरला पाठवण्यात आला.

  • या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांनी दंदे रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल, तिथल्या डॉक्टरांचं मत घेतलं,  मेडिट्रीना रुग्णालयाचे केस पेपर तपासले.

  • शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातही लोया यांचा मृत्यू कोरोनरीच्या अभावामुळे झाल्याचं निष्पन्न झालं.

  • व्हिसेरा रिपोर्टमध्येही लोया यांच्या शरीरात विष वगैरे आढळलं नाही.

  • अंतिम शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्टच्या आधारे डॉक्टरांनी लोया यांचा मृत्यू हृदय विकाराने झाल्याचा अंतिम निष्कर्ष दिला.


न्या. बी. एच. लोया मृत्यूप्रकरण काय आहे?

नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.

जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका 8 जानेवारी रोजी बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: justice loya died by heart attack says nagpur police
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV