कल्याणजवळच्या काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला आहे आणि यामुळे कल्याण-टिटवाळा शहराशी १५ गावाचा संपर्क तुटला आहे.

कल्याणजवळच्या काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

कल्याण: ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला आहे आणि यामुळे कल्याण-टिटवाळा शहराशी १५ गावाचा संपर्क तुटला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आंबिवली, फळेगावसह नजीकच्या १५ गावांचा संर्पक तुटला आहे. ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी परिसरातही पावसाची अधूनमधून जोरदार इनिंग सुरूच आहे.

तर तिकडे नाशिकच्या दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे धरण सध्या 71 टक्के भरलं त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV