तुमच्याकडे फाटक्या नोटा असतील तर किती रुपये परत मिळतील?

आरबीआयने ‘नोट परतीची नियमावली 2009’ जारी करुन, सामान्य जनतेला आपल्या फाटक्या नोटा बदलण्याचा पर्याय दिला आहे.

तुमच्याकडे फाटक्या नोटा असतील तर किती रुपये परत मिळतील?

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने फाटक्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फाटक्या नोटा असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आरबीआयने ‘नोट परतीची नियमावली 2009’ जारी करुन, सामान्य जनतेला आपल्या फाटक्या नोटा बदलण्याचा पर्याय दिला आहे.

नव्या नियमानुसार फाटक्या नोटा जसे की नोटाचा काही भाग फाटला असेल, दोन तुकडे जोडले असतील, तर त्या बदलता येतील.

फाटक्या नोटांच्या बदल्यात किती पैसे परत मिळतील?

  • भारतीय रिझर्व्ह बँक नियमावली, 2009 नुसार जर तुमच्याकडे फाटलेल्या 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नोटा असतील, आणि त्या 50 टक्क्यांपेक्षा कमी फाटल्या असतील, तर बँक तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत देईल.


 

  • जर 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नोट 50 टक्क्यांपेक्षा जास्त फाटली असेल, तर बँका तुम्हाला त्याचे काहीही पैसे देणार नाहीत.


 

  • याचप्रमाणे 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा कमी फाटली असेल, तर पूर्ण पैसे मिळतील.


 

  • तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा जास्त फाटल्या असतील, तर पूर्ण पैसे मिळणार नाहीत.


 

नोटांवर लिहिलं असेल तर काय होईल?

अनेकांना नोटांवर काहीतरी लिहिण्याची सवय असते. जर अशी नोट तुमच्याकडे आली तर त्या नोटेचं काय करायचं? असा प्रश्न पडू शकतो. अशा नोटा बँकेत जमा केल्यास, त्या तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, पण तुमच्या खात्यावर जमा होतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: know how you can change your ragged notes, RBI notification
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV