कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून प्लास्टिकबंदी

देवळात येणारे भाविक देवीच्या पुजेचं साहित्य घेताना प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात, त्यांना आता कापडी पिशव्या देण्यास मंदिरातील दुकानदारांनी सुरुवात केली आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून प्लास्टिकबंदी

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे. याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्याच्या अखत्यारित येणारी साडेतीन हजारांपेक्षा अधिक मंदिर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी भाविकांसाठी कापडी पिशव्या उपलब्ध करुन पाठिंबा दिला आहे.

अंबाबाई देवीचं मंदिर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला आणि सहा महिन्यात मंदिर परिसर प्लास्टिकमुक्त झाला. देवळात येणारे भाविक देवीच्या पुजेचं साहित्य घेताना प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात, त्यांना आता कापडी पिशव्या देण्यास मंदिरातील दुकानदारांनी सुरुवात केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी देवस्थान समिती आणि पर्यावरणवादी संस्थानी मंदिर परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यात मंदिर परिसरातील दुकानदारांना या संदर्भात जनजागृती करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत आता मंदिरातील सर्व दुकानदारांनी हा परिसर प्लस्टिक मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला.

कोल्हापूरचे मंदिर प्लास्टिकमुक्त झाल्यानंतर आता देवस्थानने त्यांच्या अखत्यारित येणारी साडेतीन हजार मंदिरं प्लाटिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबाबाई मंदिरात काही वर्षांपूर्वी चप्पल बंदी करण्यात आली होती, यालाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता मंदिर परिसरात प्लाटिक बंदीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur : Ambabai Devi temple is plastic free now
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV