कोल्हापुरी साज, चंद्रहार, मोहनमाळ, वाळे, कुंडले, अंबाबाईचे दाग-दागिने

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला नित्यविधीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली आहे.

कोल्हापुरी साज, चंद्रहार, मोहनमाळ, वाळे, कुंडले, अंबाबाईचे दाग-दागिने

कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून देवीला परिधान करण्यात येणाऱ्या दागिन्यांना पॉलिश करुन ते दागिने तयार करण्यात आले आहेत.

Kolhapur Ambabai

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला नित्यविधीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, मोहनमाळ, 2 वाळे, 2 कुंडले, किरीट, पिंपळपान, 2 सातपदरी कंठी, जोंधळेपोत, चंद्रहार, लप्पा, 1 कोल्हापुरी जडावाचा साज, मोत्यांची माळ, चिंतामणी, दोन पदरी कंठी, चिंचपेटी, 2 मोतीहार, जडावाचा चारपदरी साज, सोन्याची तनपटी , चिंचपेटी, कंठी , या दागिन्यांनी नवरात्रौत्सवात देवीला मडवण्यात येतं.

Kolhapur Ambabai 3

तसंच चांदीची प्रभावळ,पालखी, पालखींचे तोंड, दांडा,चौर्या मूर्ती, अभिषेकाची भांडी अशा विविध दागिन्यांची आणि देवीचे नित्यालंकार यासह खास नवरात्रात घातले जाणारे अलंकार यांची आज मंदीर परीसरात स्वच्छता केली.

Kolhapur Ambabai 1Ambabai

अंबाबाई मंदिराची शिखरे आणि मंदिराच्या भोवताली विद्युत माळा लावण्याचं काम सुरु आहे. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष विद्युत रोषणाई सुरूवात होणार आहे. उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त आणि 30हून अधिक CCTV ची नजर असेल.

Kolhapur Ambabai 3

नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV