सिग्नलमध्ये बिघाड करुन महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा!

या ठिकाणी पाच ते सहा टोळ्या थांबल्या होत्या. सिग्नलमध्ये बिघाड करुन या टोळ्या ट्रेनमध्ये घुसल्या. त्यांनी प्रवाशांकडून मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या.

सिग्नलमध्ये बिघाड करुन महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा!

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर बुधवारी मध्यरात्री दरोडा पडला. जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरोड्यात पैसे, सोन्याचे दागिने तसंच मोबाईल यांसारख्या वस्तू लुटल्या आहेत.

महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. ही गाडी दीड ते पावणे दोनच्या सुमारास जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. या ठिकाणी पाच ते सहा टोळ्या थांबल्या होत्या. सिग्नलमध्ये बिघाड करुन या टोळ्या ट्रेनमध्ये घुसल्या. त्यांनी प्रवाशांकडून मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या.

दरोडेखोरांनी 10 ते  15 मिनिटांत प्रवाशांना लुटलं. गाडी रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर ज्या ज्या स्टेशनवर प्रवासी उतरले त्यांनी तक्रारी नोंदवल्या. त्यामुळे सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर रेल्वे पोलिसात तक्रारी दाखल झाल्या असून पोलिस तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur : Cash, Gold, Mobile looted in Mahalaxi Express robbery
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV