अल्पवयीन तरुणाचं लैंगिक शोषण, तरुणीविरोधात गुन्हा

आरोपी तरुणी ही पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची धक्कादायक माहिती आहे.

अल्पवयीन तरुणाचं लैंगिक शोषण, तरुणीविरोधात गुन्हा

कोल्हापूर : एका तरुणीने आपल्या अल्पवयीन मुलाचं लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. आरोपी तरुणी ही पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची धक्कादायक माहिती आहे.

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. आरोपी तरुणी मनाली मधुकर शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामाच्या निमित्ताने पीडित अल्पवयीन तरुण शिंदे कुटुंबाकडे तीन-चार वर्षांपासून राहत होता. मात्र तो घरी आला, त्यावेळी त्याच्या अंगावर जखमा आढळल्यामुळे आईने त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा सुरुवातीला त्याने ही बाब लपवली. अखेर आपलं मानसिक, लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचं मुलाने सांगितलं, असा दावा त्याच्या आईने केला आहे.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र अखेर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. बालकांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कलम 7, 8 अंतर्गत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur : Minor youth allegedly sexually harassed by lady latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV