कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा लांबणीवर

विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा लांबणीवर

कोल्हापूर: उडाण सेवेअंतर्गत सुरु होणाऱ्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. येत्या रविवारी 24 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे  ती लांबणीवर पडली आहे.

विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली आहे. ती मंजूर झाल्यास मुंबई - कोल्हापूर विमानसेवा देणे शक्य होईल अशी अट घातली आहे.

त्यामुळे ही सेवा आठवडाभर तरी लांबणीवर पडली आहे.

विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक झाली. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जेव्हीके कंपनीने अद्यापही वेळेचा स्लॉट दिलेला नाही, त्यामुळे विमानसेवा सुरु होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

वेळापत्रकही ठरलं होतं

 • दरम्यान, कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचं वेळापत्रकही जाहीर झालं होतं. त्यानुसार

 • कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरु होईल.

 • दर मंगळवार, बुधवार, रविवार अशी ही विमानसेवा असेल

 • मुंबई ते कोल्हापूर दुपारी १:१५ वाजता विमान असेल, ते दुपारी 2.30 वा. कोल्हापूरला पोहोचेल.

 • त्याच दिवशी कोल्हापूर ते मुंबई दुपारी ३:२५ वाजता : मुंबईकडे निघेल, मग ते विमान दुपारी ४:४० वाजता मुंबईत पोहोचेल.


हे वेळापत्रक ठरलं असूनही आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लांबणीवर पडली आहे.

सातत्याने ब्रेक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उडान योजनेचे मार्ग जाहीर झाल्यानंतर, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु होईल, अशी घोषणा 4 एप्रिल 2017 रोजी केली होती.  मात्र ही विमानसेवा आजपर्यंत सुरुच झालेली नाही.

लांबणीवर पडलेले महाराष्ट्रातील हवाई मार्ग

 • नांदेड- मुंबई –  (जून- 2017)

 • नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)

 • नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)

 • कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)


संबंधित बातम्या

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर - मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात!

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला केंद्राचा हिरवा कंदील

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur-Mumbai flight service extended
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV