कोल्हापुरात 5 किलोचं अर्भक, राज्यातील सर्वात वजनदार बाळ

गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास बाळाचं वजन आणि उंची वाढते. बाळाचा आकार आणि वजन अधिक असेल तर नैसर्गिक प्रसुती होत नाही.

कोल्हापुरात 5 किलोचं अर्भक, राज्यातील सर्वात वजनदार बाळ

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये जन्माला आलेल्या एका बाळाचं वजन तब्बल 5 किलो आहे, तर उंची 2 फूट आहे. हे बाळ महाराष्ट्रात जन्माला आलेलं सर्वाधिक वजनाचं अर्भक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोल्हापुरातल्या राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये या बाळाचा जन्म झाला. हे बाळ राज्यात जन्माला आलेलं सर्वात मोठं बाळ असल्याचा दावा डॉ. सरोज शिंदे यांनी केला आहे.

खरं तर गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास बाळाचं वजन आणि उंची वाढते. बाळाचा आकार आणि वजन अधिक असेल तर नैसर्गिक प्रसुती होत नाही. गर्भवतीसह बाळालाही धोका उद्भवण्याची शक्यता असते.

विशेष म्हणजे या बाळाच्या आई स्वाती किणीकर यांना कोणताही आजार नाही. शिवाय ही प्रसुती नैसर्गिकरित्या झाली असून बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरुप आहेत.

यापूर्वी 15 जून 2010 रोजी गुजरातमधील बडोद्यात 5 किलो 800 ग्रॅम वजनाचं बाळ जन्माला आलं होतं. महाराष्ट्रात पाच किलो वजनाच्या आसपासची बालकं जन्मली आहेत, मात्र बहुतांश महिलांना सिझेरियन करावं लागलं.

राज्यात पहिल्यांदाच पाच किलो वजनाचं बालक नैसर्गिक पद्धतीने जन्मले असून उंचीच्या बाबतीतही या बाळाने विक्रम मोडले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV