इलेक्ट्रीक शॉक देऊन मारहाण, कोल्हापूर पोलिसांची थर्ड डिग्री

कोल्हापूर पोलिसांच्या थर्ड डिग्री कारवाईला सामोरा गेलेला रामाकांत गावडे नावाचा तरूण समोर आला आहे.

इलेक्ट्रीक शॉक देऊन मारहाण, कोल्हापूर पोलिसांची थर्ड डिग्री

सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येमुळे सांगली पोलिसांची अब्रू धुळीला मिळाली असतानाच कोल्हापूर पोलिसांनीही असाच प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोल्हापूर पोलिसांच्या थर्ड डिग्री कारवाईला सामोरा गेलेला रामाकांत गावडे नावाचा तरूण समोर आला आहे.

पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या अत्याचाराची कहाणी त्याने एबीपी माझाला सांगितली. अनिकेत कोथळेच्या हत्येविरोधात सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान रमाकांत गावडे सामील झाला होता. यावेळी त्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात वाचा फोडली.

''इलेक्ट्रीक शॉक देऊन मारहाण''
कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत नेऊन बेल्टने मारहाण केली. मच्छर मारायच्या रॅकेटवर लघवी करायला लावून इलेक्ट्रीक शॉक दिला. दुसऱ्या दिवशी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांना सांगितलं की, यांनी खुप मारहाण केलीय, दखल घेऊन त्याप्रमाणे रिपोर्ट द्या. पण तसं सांगितलेलं कळल्यावर पुन्हा एकदा मारलं. हा सर्व प्रकार न्यायाधीशांना सांगणार, असं मी कोर्टात नेल्यानंतर म्हणालो. मात्र असं म्हटल्यानंतर पोलिसांना वाटलं हा सर्व सांगून दंगा करणार. त्यामुळे त्यांनी पुन्हा ओढत कोठडीत नेलं आणि मारहाण केली. जवळपास 30 ते 32 तास कोठडीत ठेवल्यानंतर रात्री साडे नऊ वाजता समोरच्या खानावळवाल्याची सही घेऊन किरकोळ जामिनावर सुटका केली, अशी माहिती रमाकांत गावडेने एबीपी माझाला दिली.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर कोल्हापूर पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचाही एबीपी माझाचा प्रयत्न आहे.

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur police used third degree alleges victim
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV