विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक

परंतु शिक्षेमुळे विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. तिचे पाय जमिनीवर स्थिर राहत आहेत, ना पायातील कळा थांबत आहेत.

विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक

कोल्हापूर : कोल्हापुरात विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. अश्विनी देवाण असं अटक केलेल्या मुख्याध्यापिकेचं नाव आहे.

चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात गृहपाठ न केल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक अश्विनी देवाण यांनी तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.

गृहपाठ न केल्याने कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा

परंतु शिक्षेमुळे विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. तिचे पाय जमिनीवर स्थिर राहत आहेत, ना पायातील कळा थांबत आहेत. तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विजयाची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार चंदगड पोलिसांनी आज मुख्याध्यापकअश्विनी देवाणे यांना अटक केली. त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur : Principal arrested for punishment of 500 Lift-Ups to girl student
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV