सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले, कार्यकर्त्यांची हाणामारी

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते आपसात भिडले.

सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले, कार्यकर्त्यांची हाणामारी

कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत चांगलाच राडा झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या.

कोल्हापुरातील राजराम साखर कारखान्याची वार्षिक सभा आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. या कारखान्यावर काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळं ही सभा एकतर्फी होऊ नये यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या समर्थक सभासदांनी सभेत विविध प्रश्नांवर संचालकांना जाब विचारायला सुरुवात केली.

Satej Patil, Mahadevrav Mahadik सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक

यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.  यावेळी महादेवराव महाडिक यांचे कार्येकर्ते मुद्द्यावरून गुद्यावर आले. एकमेकांना शिवीगाळ करत थेट आपापसात अंगावर धावून जात भिडले.  यावेळी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या थेट अंगावर फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळं सभेत एकाच गोंधळ उडाला.

आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात राजकीय विस्तुष्ट निर्माण झालं आहे. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत देखील सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यानी महादेवराव महाडिक यांना जाब विचारला होता. यावरून जिल्ह्यत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आजच्या सभेत काय होणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. सभेत गोंधळ उडाल्याने सभा आटोपती घेण्यात आली.संबंधित बातम्या

पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?


सतेज पाटील महाडिकांना विजय मिळवून देणार की मंडलिक बाजी मारणार? 


सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पाच वर्षानंतर भेटतात तेव्हा 


कोल्हापूरचे भाजप आमदार शरद पवारांच्या भेटीला

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV