कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

या प्रकरणी मकासरे यांच्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील, दोषींच्या वकिलांना धमक्याचं सत्र सुरु आहे. मुख्य दोषी जितेंद्र शिंदेचे वकील योहान मकासरे यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी मकासरे यांच्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर दोषी क्रमांक 3 नितीन भैलुमेचे वकील प्रकाश आहेर यांनाही धमकी देण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, "21 नोव्हेंबरला साताऱ्यावरुन बोलत असल्याचं सांगत मकासरे यांना फोन आला. दोषींना जन्मठेपेची शिक्षा का मागितली? तुम्ही ही केस का लढवली? तुमची मुलगी असती तर ही केस लढला असता का?" असा सवाल विचारण्यात आला.

"तसंच 21 तारखेला निकाल का लागला नाही, तुम्ही दोषींची शिक्षा कमी करण्याची मागणी का केली, दोषींना माफी देऊन मोकळे सोडा, मग आम्ही पाहतो," असं फोनवरुन धमकावल्याचं योहान मकासरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

विधी सेवा प्राधिकरणाने कोपर्डी खटल्यातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेची बाजू मांडण्यासाठी योहान मकासरे यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, याआधीच योहान मकासरे यांना यापूर्वीच दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत.

अॅड. योहान मकासरे यांचा युक्तीवाद (आरोपी क्रमांक 1- जितेंद्र शिंदेचे वकील) :


“मी सरकारकडूनही आरोपी नंबर एकचं काम पाहतोय, आणि फाशी न देता जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली आहे. आरोपी म्हणत होता, मी मारलं नाही. पण आज सुनावणी यासंदर्भात नव्हतीच. फाशी की जन्मठेप, हे सांगायचं होतं. आम्ही जन्मठेपेची मागणी केली आहे.”

संबंधित बातम्या :

फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!

कोपर्डीचा निकाल 29 नोव्हेंबरला, तीनही आरोपींना फाशीच हवी: उज्ज्वल निकम

कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा

कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे

खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम

कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते?

कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा

कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं….

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kopardi Rape and Murder Case : Convict Jitendra Shinde’s lawyer receives threat call
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV