सांगलीतील कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा

अनिकेतच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे.

सांगलीतील कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा

सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. त्यांच्यासमोर कोथळे कुटुंब प्रचंड आक्रमक झाले.

पीएसआय युवराज कामटेसह आणखी काही वरीष्ठ अधिकारी यात असून त्यांच्यावर जर कारवाई होऊन न्याय मिळाला नाही, तर आमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करेल, असा इशारा अनिकेतची पत्नी आणि भावाने गृहराज्यमंत्र्याना दिला.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी आज सांगलीत जाऊन कोथळे कुटुंबियांची भेट घेतली. सांगली पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्यामुळं अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कथित सेक्स रॅकेट दडपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

दरम्यान, अनिकेतच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kothale family warn to suicide latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV