लातूरचा कॉपी पॅटर्न, जळकोटमध्ये शाळेच्या भिंतीवर चढून कॉपी

राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र लातूर जिल्ह्यातल्या जळकोटमध्ये कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस बंदोबस्त नसल्याचा फायदा घेत ही कॉपी पुरवण्यात आली.

लातूरचा कॉपी पॅटर्न, जळकोटमध्ये शाळेच्या भिंतीवर चढून कॉपी

लातूर : कॉपी मुक्तीसाठी सरकारने कितीही तयारी केलेली असली तरी कॉपी बहाद्दरांपुढे सगळंच मातीमोल ठरत आहे. कारण, दहावीच्या पहिल्याच पेपरला लातुरात कॉपीच्या घटना कॅमेरात कैद झाल्या आहेत.

लातूरच्या जळकोटच्या जिल्हा परिषदेतील हा प्रकार आहे. शाळेच्या गेटवर पोलीस नाहीत याचा फायदा घेत मुलांची टोळकी शाळेच्या कंपाऊंड वॉलवर चढून वर्गातल्या विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या पुरवत आहेत.

शाळेच्या परिसरात पोलिसांचा अभाव होता, मात्र गट शिक्षण अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. इतकंच नाही तर मराठी आणि उर्दूच्या पेपरला चक्क गाईड घेऊन बसण्याचाही विक्रम या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरारी पथकांची संख्या कितीही वाढवली तरी कॉपीमुक्त परीक्षा होतील का, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायमच आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात 252 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: latur copy pattern goes viral on social media in Jalkot
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV