उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामतीतील वकील हेमचंद्र मोरे यांनी केली आहे.

उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

बारामती : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (शुक्रवार) एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत भिडे गुरुजींची जाहीरपणे पाठराखण केली होती.

दरम्यान, उदयनराजेंच्या याच मुलाखतीचा आधार घेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामतीमधील हेमचंद्र मोरे या वकीलांनी एक पत्रक काढून बारामती पोलिसांकडे ही मागणी केली आहे. उदयनराजेंनी या मुलाखतीमध्ये वारंवार जातीचा उल्लेख करुन दलितांविषयी आक्षेपार्ह विधानं केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उदयनराजेंकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर

कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारानंतर भिडे गुरुजींवर आरोप सुरु झाले. त्यानंतर उदनयराजे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. याशिवाय जितेंद्र आव्हाड यांनी बोलतांना विचार करावा असा सल्लाही उदयनराजे भोसलेंनी दिला.

कोरेगाव भीमा दगडफेकी प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजी दगडफेकीचे सूत्रधार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या घटनेमागे काही हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे.

संबंधित बातम्या :

देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

र्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: lawyer demand for filing an Atrocity complaint against Udayanraje Bhosale latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV