वेण्णा लेकला गळती, भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे

भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत.

वेण्णा लेकला गळती, भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे

सातारा: साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. ही गळती थांबविण्यासाठी भगदाडात जुने कपडे कोंबण्याचा प्रयत्न रात्रीपासून सुरु आहे.

त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत.

खरं तर यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.

venna lake

धरणाला मोठी गळती

पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याची बातमी, एबीपी माझाने 5 ऑक्टोबरला दिली होती. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.

2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून  तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती.

वेण्णा लेक हे सध्या महाबळेश्वर गिरीस्थान यांच्या ताब्यात आहे.

संबंधित बातमी

महाबळेश्वरमधील वेण्णा लेकला गळती, परिसरात भीती

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: leakage in venna lake, mahabaleshwar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV