पाण्याच्या शोधात बिबट्या हौदात पडला!

गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना कळवलं असलं तरी अद्याप बिबट्याला पकडण्यासाठी काहीच हालचाली झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

पाण्याच्या शोधात बिबट्या हौदात पडला!

जालना : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या नायगाव परिसरात एका शेतात पाण्याच्या हौदात बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नायगाव शिवारात एकनाथ फुपाटे या शेतकऱ्याच्या शेतात पाण्याच्या हौदात हा बिबट्या आढळून आला.

शेतकरी एकनाथ फुपाटे हे 4 वाजता आपल्या शेतात गेले असता त्यांना आवाज आल्याने हौदात वाकुन पाहिले असता त्यांना हा बिबट्या दिसला. दरम्यान या घटनेमुळे गावातल्या लोकांची शेतात गर्दी केली होती.

दरम्यान, गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना कळवलं असलं तरी अद्याप बिबट्याला पकडण्यासाठी काहीच हालचाली झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी सायंकाळपर्यंत कुठल्याच हालचाली दिसत नसल्याने उद्या सकाळी हा बिबट्या जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: leopard fallen in lake in jalna latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: jalna leopard जालना बिबट्या
First Published:

Related Stories

LiveTV