विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे. शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आली आहे.

Lingayat Samaj’s calls Solapur Bandh against the university’s renaming

फाईल फोटो

 

सोलापूर : विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे.  शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सोलापुरात नामांतराविरोधात दोन मतं होती. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपुरात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. त्यानंतर या नामांतरावर लिंगायत समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली.

लिंगायत समाजाकडून सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचं नाव देण्याची मागणी होती. तर धनगर समाजाकडून विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं अशी मागणी होती.

विद्यापीठाच्या नामांतरासाठी सुरुवातीला धनगर समाजाने सुरुवातीला मोर्चा काढला. त्यानंतर लिंगायत समाजाने 18 सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण शिवयोगी सिद्धेश्वर नाव देण्याची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत. 12 व्या शतकातील या महापुरुषाने लोकोद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सिद्धरामेश्वरांच्या कार्याचा दाखला देऊन, त्यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व मठांनी आणि देवस्थानांनी केली होती.

दुसरीकडे धनगर समाजाने विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी लढा उभा केला होता. ऑगस्टमध्ये धनगर समाजाने विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी केली होती. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला शिवसेनेसह इतर समाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता.

पण नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली. त्यामुळे लिंगायत समाज नाराज झाला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना आदी संघटनांनी आज सोलापूर बंदची हाक दिली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO : स्पेशल रिपोर्ट : सोलापूर विद्यापीठ, नामांतर आणि वाद

सोलापूर विद्यापीठाला अखेर अहिल्याबाई होळकरांचं नाव!

क्या हुआ तेरा वादा…? मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच गाणं वाजलं

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Lingayat Samaj’s calls Solapur Bandh against the university’s renaming
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार
राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार

अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा

औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले
नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

नवी दिल्ली/अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017* 1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे
गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!
मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

अहमदनगर : मनसेच्या पत्र व्यवहारानंतर राज्यस्तरीय कबड्डी आणि

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी
कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर
तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक