स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारचं 'आधार'अस्त्र

महाराष्ट्रातील अनेक जोडपी गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येसाठी शेजारील राज्यांची वाट धरतात.

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारचं 'आधार'अस्त्र

मुंबई : राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता 'आधार' अस्त्र काढलं आहे. सोनोग्राफी करण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्याची तयारी सुरु आहे.

महाराष्ट्रातील अनेक जोडपी गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येसाठी शेजारील राज्यांची वाट धरतात. अनेक महिला आपलं माहेर असल्याचं सांगत महाराष्ट्रातून शेजारी राज्यांमध्ये सोनोग्राफीसाठी येतात.

गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दादरा-नगर हवेलीमधील अनधिकृत दवाखान्यांमध्ये गर्भलिंग चाचणीसाठी रांगा लागतात. मात्र आता अशा जोडप्यांना सोनोग्राफीसाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य असेल.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीत या विषयावर आधीच चर्चा करण्यात आली आहे. शेजारील राज्यांनाही यासंबंधी माहिती देण्यात येईल. प्रत्येक रुग्णाला ओळखपत्र सादर करणं अनिवार्य असेल. जे यूआयडीएआय कार्ड सादर करणं शक्य नाही, त्यांना मतदार ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असेल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: link Aadhaar to avail sonography, Government plans to curb sex determination and foeticide latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV