‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री

दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री

बीड : बीडमधील महिला कॉन्स्टेबलने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला दिल्या आहेत.

दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

प्रकरण काय आहे?

माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिलेनं महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती.

हा विषय अधीक्षकांच्या अखत्यारित नसल्यामुळे त्यांनी तिचा अर्ज पोलिस महासंचालक सतिष माथूर यांच्याकडे पाठवला. मात्र आता महासंचालकांनी ही परवानगी नाकारली आहे. लिंगबदल करुन सेवेत रुजू करुन घेण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं पत्रात म्हटल्याची माहिती आहे.

23 जून रोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कॉन्स्टेबलची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला होता.

संबंधित बातमी : बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Look sensitivity in Lady constable sex exchange case, CM orders Home Ministry latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV