शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 12:43 PM
शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!

प्रातिनिधिक फोटो

बीड : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा काळात एकेवेळचं बाहेर जेवायचं असल्यास किमान 100 रुपये तरी मोजावे लागता. मात्र, हेच जेवण तुम्हाला 1 रुपयात दिले तर…? खरंतर सहसा विश्वास यावर तुमचा बसणार नाही. मात्र, बीडमध्ये एका रुपयात जेवण दिले जाते. मात्र, हे भरपेट स्वस्त जेवण फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे.

भाजी, चपाती, भात, वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचं पाणी… हे सगळं केवळ एक रुपयात मिळत आहे. शेतीमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावं लागतं. यावेळी शेतकऱ्यांच्या जेवणाचं हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रुपयात जेवण हा उपक्रम राबवला.

माजलगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होतेच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवल मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकऱ्याला मालाची पोचपावती दाखवणं बंधनकारक आहे.

गेल्या सहा वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण दिल जातं आहे. बाजार समितीने एका हॉटेल चालकाला एकोणतीस रुपयाप्रमाणे प्रती शेतकऱ्याचं जेवण ठरवून दिले आहे. यात शेतकऱ्याने फक्त एक रुपया द्यायचा, बाकी राहिलेले पैसे बाजार समिती भरते. रोज दीडशे ते दोनशे शेतकरी या ठिकाणी जेवण करत आहेत.

या वर्षी सरकारने तूर खरेदी केंद्र सुरु केले खरे, पण 15-15 दिवस तुरीचे मापच न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समितीची आवारातच मुक्कामी राहावे लागले. अशा परस्थितीमध्ये हमीभावाबरोबरच प्रत्येक बाजार समितीने आपल्या शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवण हा उपक्रम सुरु केला, तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. एरव्ही केवळ बाजारभाव पडल्याने अनेक बाजार समिती ओस पडलेल्या असतात. मात्र, माजलगाव बाजार समिती मात्र याला अपवाद आहे.

First Published:

Related Stories

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान

अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!
अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!

वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही,