रस्ते, विमान, ट्रेन, महाराष्ट्र बंदचा सगळीकडे परिणाम

या बंदमुळे फक्त ट्रक चालकांचं 2 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा दावा अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केला आहे.

By: | Last Updated: 03 Jan 2018 10:08 PM
रस्ते, विमान, ट्रेन, महाराष्ट्र बंदचा सगळीकडे परिणाम

मुंबई : महाराष्ट्रात आज पुकारण्यात आलेल्या बंदमुळे कितीचं नुकसान झालं याचे अधिकृत आकडे मिळू शकले नसले, तरी वाहनधारकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या बंदमुळे फक्त ट्रक चालकांचं 2 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा दावा अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केला आहे.

211 एसटी बस फोडल्या

एसटी महामंडळालाही याचा फटका बसला आहे. एसटीचे 250 डेपोंपैकी 213 डेपो बंद होते. त्यामुळे एसटीचंही नुकसान झालं. राज्यभरात एसटी महामंडळाच्या 211 बसेसची तोपफोड करण्यात आली. धुळ्यात सायंकाळपर्यंत एसटी सेवा सुरु झाली नव्हती.

विमानसेवेवरही परिणाम

मुंबई विमानतळावरही महाराष्ट्र बंदचा परिणाम पाहायला मिळाला. 12 विमानं रद्द करण्यात आली, तर 235 विमानं उशिराने रवाना झाली.

मुंबई, ठाण्यात बसचं नुकसान

मुंबईत दिवसभरात एकूण 3370 बसेसपैकी 3208 बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 90 बसेसची तोडफोड करण्यात आली. तसेच 4 बसचालक काचा लागून जखमी झाले. तर ठाण्यातही 5 बसची तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, मुंबई खासगी वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Maharashtra bandh effect on transposrt sector damege of public property
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV