राज्यातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

राज्यातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

मुंबई : केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

या निर्णयामुळे 2 हजार 15 कोटीचं नुकसान होणार आहे. पेट्रोलचे दर कमी केल्याने 940 कोटी, तर डिझेलचे दर कमी केल्याने 1 हजार 75 कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास 3 हजार 67 कोटींची घट अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार काटकसरीतून घट भरुन काढणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी कमी केली आणि राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

केंद्र सरकारच्या या आवाहनाला आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद दिला आहे. गुजरात सरकारने 4 टक्के व्हॅट कमी केल्याने पेट्रोल 2.93 रुपये, तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

संबंधित बातमी : गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल जवळपास 3 रुपयांनी स्वस्त!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV