अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

महाराष्ट्रातील एसटी चालक-वाहकांची अशी परिस्थिती असताना, शेजारील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुलनेने जास्त आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

धुळे/ मुंबई: तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. चार-चार हजारावर राबणारे ड्रायव्हर-कंडक्टर एसटी तर चालवतात, मात्र तुटपुंज्या पगारात घर कसं चालवायचं, हा त्यांचासमोरचा मोठा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील एसटी चालक-वाहकांची अशी परिस्थिती असताना, शेजारील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुलनेने जास्त आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत पगाराचा लेखाजोखा

चालकांचा (ड्रायव्हर) पगार

  • महाराष्ट्र - 4700 ते 15367 रुपये

  • कर्नाटक- 12400 ते 17520

  • तेलंगणा - 13070 ते 34490

  • राजस्थान- 5200 ते 20200

  • उत्तर प्रदेश- 5200 ते 20200


वाहकांचा (कंडक्टर) पगार

  • महाराष्ट्र- 4350 ते 14225 रुपये

  • तेलंगणा- 12340 ते 32800

  • कर्नाटक- 11640 ते 15700

  • राजस्थान- 5200 ते 20200

  • उत्तर प्रदेश- 5200 - 20200


याशिवाय इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो. मात्र महराष्ट्रातील एसटी चालक-वाहकांना हा ग्रेड पे मिळत नाही.

दुसरीकडे इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के इतका आहे, तर महाराष्ट्रात हा प्रवासी कर 17.5 टक्के इतका आहे. असं असूनही महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी का? असा सवाल एसटी कर्मचारी करत आहेत.

बेस्ट आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव

मुंबईतील बेस्टची कर्मचारी संख्या 41 हजार आहे , तर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 7 हजार आहे. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या या एसटीतील कर्मचाऱ्यांना केवळ अडीच हजार दिवाळी बोनस, तर तोट्यात असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱयांना साडे पाच हजार दिवाळी बोनस, हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असल्याची टीका होत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV