महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही

महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मंत्री आणि भाजपचे आमदार थेट दिल्लीत पोहोचले. अर्थमंत्री अरुण जेटली कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र अवघ्या 15 ते 20 मिनिटातच ही बैठक आटोपली. या बैठकीत कोणतंही ठोस आश्वासन मात्र देण्यात आलेलं नाही.

 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जेटली आणि राधामोहन सिंह यांच्यासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. मात्र, याबाबत कोणतंही ठोस उत्तर अद्याप मिळालं नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आपण लवकरच काही तरी योजना आणू असं उत्तर जेटली आणि कृषीमंत्र्यांकडून देण्यात आलं.

 

‘राज्यातील शेतकऱ्यांचं एकूण कर्ज 30 हजार 500 कोटींचं आहे. त्यामुळे एवढं कर्ज जर राज्यसरकारनं माफ केलं तर, सरकार कृषी क्षेत्रात गुंतवणूक करु शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारला केंद्र सरकारनं मदत करावी.’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

‘जेटलींनी आमचं म्हणणं ऐकलं. देशातील शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार नक्कीच उभं राहिलं. लवकरच राज्य सरकारसोबत मिळून आम्ही नवी योजना तयार करु.’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

 

दरम्यान, महाराष्ट्रात 2014च्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात 3 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे. तर एकट्या मराठवाड्यात दोन महिन्यात 117 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

 

गेली सलग तीन वर्ष महाराष्ट्रानं दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा हातात पीक आलं. मात्र सोयाबीन, तूर आणि इतर कडधान्य तेलबियांना भाव न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कर्जमाफीची मागणी लावून धरली. ज्यासाठी 30 हजार कोटीची गरज आहे.

 

संबंधित बातम्या:

.. तर आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो : धनंजय मुंडे

कर्जमाफी केल्यास आत्महत्या होणार नाही याची हमी देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सवाल

कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत घ्यावी, शिवसेना मंत्र्यांची मागणी

‘कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क’, कारागृहातून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

First Published: Friday, 17 March 2017 7:05 PM

Related Stories

कर्नाटकात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा
कर्नाटकात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी,...

बेळगाव : ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा

...तर पाकिस्तानच नष्ट होईल : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस
...तर पाकिस्तानच नष्ट होईल : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस

मुंबई : पाकिस्तान कधीच भारताविरोधी अण्वस्त्र वापरणार नाही. कारण

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

...तर पाकिस्तानवर आणखी कठोर कारवाई करु, गडकरींचा इशारा
...तर पाकिस्तानवर आणखी कठोर कारवाई करु, गडकरींचा इशारा

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत पुरवणारं पाकिस्तान जर आता सुधारलं

भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!
भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत यंदा गोवा ही भारतीय पर्यटकांची पहिली

आयटी क्षेत्राला ग्रहण नाही, 2016-17मध्ये  1.7 लाख नव्या नोकऱ्या
आयटी क्षेत्राला ग्रहण नाही, 2016-17मध्ये 1.7 लाख नव्या नोकऱ्या

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रात मागील तीन वर्षात तब्बल सहा लाख तरुणांना

सियाचिनजवळ स्कर्दूत पाक सैन्याच्या लढाऊ विमानाचं उड्डाण
सियाचिनजवळ स्कर्दूत पाक सैन्याच्या लढाऊ विमानाचं उड्डाण

सियाचिन : भारताने कारवाई करत जम्मू काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमधील

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2'चं कृष्णा खोऱ्याशी कनेक्शन?
भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2'चं कृष्णा खोऱ्याशी कनेक्शन?

नवी दिल्ली : घुसखोरांना मदत करण्याऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य

उत्तराखंडमध्ये भाविकांची बस नदीत कोसळली, 22 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये भाविकांची बस नदीत कोसळली, 22 जणांचा मृत्यू

देहरादून: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

नवी दिल्ली : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन