महिंद्रा एक्सयूव्ही 500 पेट्रोल कार लाँच, किंमत 15.49 लाख

एक्सयूव्ही 500 पेट्रोल कारची किंमत 15.49 लाख (एक्स शोरुम किंमत) आहे.

By: | Last Updated: 06 Dec 2017 02:45 PM
महिंद्रा एक्सयूव्ही 500 पेट्रोल कार लाँच, किंमत 15.49 लाख

मुंबई : महिंद्रानं आपल्या लोकप्रिय एक्सयूव्ही 500 कारचं पेट्रोल व्हेरिएंट नुकतंच लाँच केलं आहे. या कारची किंमत 15.49 लाख (एक्स शोरुम किंमत) आहे. या कारची स्पर्धा जीप कंपासशी असणार आहे.

Mahindra xuv 500 car 1

महिंद्रा एक्सयूव्ही 500 पेट्रोलमध्ये 2.2 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. ज्याची 140 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क आहे. यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

एक्सयूव्ही 500 जी एटीमध्ये अँड्रॉई़ड ऑटो सपोर्ट 7.0 टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम, 8 पद्धतीनं पॉवर अॅडजस्ट होणारी ड्रायव्हर सीट, ड्यूल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, पॅसिव्ह की लेस एंट्री आणि पुश बटन स्टार्ट-स्टॉपसह अनेक खास फीचरही देण्यात आले आहेत.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mahindra xuv 500 petrol car launched latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV