पुणे-सोलापूर हायवेवर अपघात, 11 जण जखमी

या अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे-सोलापूर हायवेवर अपघात, 11 जण जखमी

मुंबई : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुली कांचन हद्दीत भीषण अपघात झाला. दोन ट्रकनी एकमेकांना जोरदार धडक दिली.

या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमी पैकी काही जण इंदापूर परिसरातील तर काही उमरगा परिसरातील आहेत.

खेडेकर मळा येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाळूची वाहतूक करणारा ट्रक आणि टायरची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात धडक झाली.

जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: major accident at pune solapur highway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV