बुलडाण्यात देवदर्शनाहून परतताना अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

अपघातग्रस्त भाविक हे बुलडाण्यातील जाईचा देव येथे दर्शनासाठी आले होते.

बुलडाण्यात देवदर्शनाहून परतताना अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर रोडवरील हिवरा आश्रमाजवळ देवदर्शनावरुन परतताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून गाडीचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

अपघातग्रस्त सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये एका लहान बाळाच्या आईचा समावेश असून, अवघ्या 4 महिन्यांचे बाळ मात्र सुदैवाने वाचलं आहे.

दर्शन आटोपून ते चिखली-मेहेकर मार्गे नांदेडला जाण्यासाठी निघाले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हिवरा आश्रमाजवळ त्यांच्या  गाडीने 3 ते 4 पलट्या मारल्या. अपघातग्रस्त भाविक हे बुलडाण्यातील जाईचा देव येथे दर्शनासाठी आले होते.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: major accident in buldana latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: accident buldana अपघात बुलडाणा
First Published:
LiveTV