ताबा सुटला, ट्रक उलटला, मृतदेह काढण्यासाठी थेट जेसीबी बोलावला!

मृतांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष मजुरांचा समावेश आहे. एसटी संपामुळे हे मजुर ट्रकमधून प्रवास करत होते.

ताबा सुटला, ट्रक उलटला, मृतदेह काढण्यासाठी थेट जेसीबी बोलावला!

सांगली: ऐन दिवाळ सणात सांगलीत पहाटे भीषण अपघात झाला. फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. तर 9 प्रवासी जखमी आहेत. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ ही भीषण दुर्घटना घडली.

मृतांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष मजुरांचा समावेश आहे. एसटी संपामुळे हे मजुर ट्रकमधून प्रवास करत होते.

या अपघातातील जखमींना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकचालकाला विनंती

हे सर्व प्रवासी कर्नाटकातील सिंधगीवरून कराडकडे येत होते. त्यावेळी महाराष्ट्रातील एसटी बंद असल्यामुळे त्यांनी फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला विनंती केली आणि ट्रकमधून प्रवास सुरु केला.

हा ट्रक पहाटे मणेराजुरीच्या माळावर आला असता, धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रकच्या मागे फरशीवर  बसलेले प्रवासी फरशी खाली चिरडले गेले. यामध्ये 10 जण जागेवर ठार झाले. तर ट्रकच्या केबिनमध्ये बसलेले अन्य 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Sangli Accident 5

अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. यावेळी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, तर जेसीबीच्या सहाय्याने ट्रकखाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ट्रक उलटल्यामुळे ट्रकमधील फरशा मागे बसलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळल्या. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अंगावरच्या फरशा हटवून मृतदेह बाहेर काढणं सहज शक्य नव्हतं. त्यामुळे जेसीबी बोलवण्याशिवाय पर्याय नव्हता.

संबंधित बातम्या

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यू

 सांगलीतील भीषण अपघाताचे फोटो

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV