वाशिममध्ये माणुसकीला काळिमा, जखमी वानराला अमानुष मारहाण

कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं आहे.

वाशिममध्ये माणुसकीला काळिमा, जखमी वानराला अमानुष मारहाण

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं आहे.

तसेच या वानराच्या मृत्यूनंतर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रीकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले.

पवन बांगर असं वानराला मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून, त्य़ाच्यावर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे प्राणीप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्हिडीओ पाहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: man hit monkey in washim latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV