VIDEO : माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटवत नेलं!

व्हिडीओ शूट केल्यानंतर माथेफिरुनेच हा व्हिडीओ व्हाट्सअपवर पोस्ट केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक चंद्रकुमार मीना ज्या व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन आहेत, त्यांच्याच ग्रुपवर याने हा व्हिडीओ टाकला.

VIDEO : माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटवत नेलं!

नांदेड : माणसांमधली माणुसकी संपत चालली आहे का, अशी शंका यावी अशी घटना नांदेडमध्ये घडली आहे. एका माथेफिरुने कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेले.

नांदेड शहरातल्या वाघीरोड परिसरातला हा व्हिडीओ आहे. इम्तियाज सय्यद असं या माथेफिरुचं नाव आहे.

साखळीनं या कुत्र्याला बांधून हा माणूस त्याला खेचत नेत आहे. यामुळे हा कुत्रा जिवाच्या आकांतानं ओरडतो आहे. पण या माथेफिरुला याची थोडीही दया येत नाही.

व्हिडीओ शूट केल्यानंतर माथेफिरुनेच हा व्हिडीओ व्हाट्सअपवर पोस्ट केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक चंद्रकुमार मीना ज्या व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन आहेत, त्यांच्याच ग्रुपवर याने हा व्हिडीओ टाकला.

या सगळ्या प्रकारानंतर पोलीस अधीक्षकांनी इम्तियाजवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र सध्या हा माथेफिरु फरार असल्याचं कळतं आहे.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: man trying to kill dog in nanded latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV