वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्न

नवरदेव मायकल ट्रेन्टने तृप्ती गायकवाडला प्रपोज केलं. तृप्तीचे वडील आले... त्यांनी पाहिलं.. आणि मग लग्न ठरलं...

वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्न

सांगली : लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं सांगलीला' अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. सांगलीत पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

लंडनचे पाहुणे नाच-नाच नाचले...  नवरदेव मायकल घोड्यासोबत... तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर. सांगलीच्या पोलिस मुख्यालयातल्या हॉलमध्ये फिरंगी माहोल होता आणि या परदेशी बाबूची देशी हिरॉईन थेट पालखीतनं आली.

काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पलिकडे न जाणारे परदेशी पाहुणे रंगीत संगीत झाले होते. फेटे, झब्बे, साड्या... सगळंच वेगळं... निमित्त होतं... सांगलीच्या तृप्तीचं आणि लंडनच्या मायकलच्या लग्नाचं...

हे लग्न कसं ठरलं, याची गोष्टही मोठी रंजक आहे. नवरदेव मायकल ट्रेन्टने तृप्ती गायकवाडला प्रपोज केलं. तृप्तीचे वडील आले... त्यांनी पाहिलं.. आणि मग लग्न ठरलं...

मला काय इंग्रजी येत नाही... पण आम्ही चौकशी केली आणि मंजुरी दिली, असं तृप्तीचे वडील प्रकाश गायकवाड सांगतात.
आता खुद्द पिताश्रींची मंजुरी मिळाल्यावर काय... दिला बार उडवून...

आधी हळद लागली... विहिणबाईंनी आढेवेढे न घेता एकमेकांना हळद लावली... मानपान झालं... मुंडावळ्या बांधल्या... आणि मग मंगलाष्टका...

सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली...

लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालय लंडन'ला साकारलं... आता या लग्नातून कुणी तरी 'लंडनचं वऱ्हाड आलं सांगली'ला साकारायला हरकत नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Michael from London weds Sangali’s daughter Trupti in Indian wedding latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV