जेव्हा चंद्रकांतदादा गातात... टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली!

टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं.

जेव्हा चंद्रकांतदादा गातात... टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली!

कोल्हापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील सावली केअर सेंटरमध्ये कोळी गीत गाऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं.

टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं.

सावली केअर सेंटर ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात.

पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे जी अशा पद्धतीनं काम करते. या रुग्णांसोबत काही वेळ घालवून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांतदादांनी काही महिन्यांपूर्वीही हेच गाणं गाऊन लहान मुलांच्या शिबिरात ठेका धरला होता.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Minister Chandrakantdada Patil sing song timkyachi choli, in Kolhapur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV