गिरीष महाजनांवर गुन्हा दाखल करा: राष्ट्रवादी काँग्रेस

वन कायद्याचा भंग केल्याने, महाजनांवर गुन्हा दाखल करुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

By: | Last Updated: 28 Nov 2017 10:44 AM
गिरीष महाजनांवर गुन्हा दाखल करा: राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव: जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावले होते. त्यामुळे त्यांनी वन कायद्याचा भंग केल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

गिरीष महाजनांनी काल केलेल्या हिरोपंतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

गेल्या दोन महिन्यात नरभक्षक बिबट्यानं सहा जणांचा बळी घेतला आहे.  त्यामुळे या परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

त्यानंतर सरकारनं या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही जबाबदारी वन विभागाची असताना गिरीष महाजनांनी सुरक्षेची तजवीज नसताना नसती उठाठेव का केली? हा सवाल आहे.https://twitter.com/nawabmalikncp/status/935359466786000896

संबंधित बातम्या

हातात बंदूक घेऊन गिरीश महाजन नरभक्षक बिबट्याच्या शोधाला

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Minister Girish Mahajan has violated the Wildlife Protection Act, a case should be registered against him : NCPs Nawab Malik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV