जलसंधारण मंत्री राम शिंदे जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरतात...

कर्जतला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला.

जलसंधारण मंत्री राम शिंदे जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरतात...

अहमदनगर : जलसंधारणमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे चक्क कबड्डीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. मात्र राम शिंदे यांच्या संघाचा निसटता पराभव झाला.

कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघाने राम शिंदेंच्या संघावर मात केली. दोन्ही संघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग होता. राम शिंदे यांनी स्पोर्ट्स ड्रेस परिधान करुन झोकात एंट्री केली. यावेळी प्रेक्षकांनीही टाळ्या-शिट्ट्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.

राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघात शनिवारी सायंकाळी प्रदर्शनीय सामना रंगला. या सामन्यात पालकमंत्री शिंदे यांच्या संघाला पाच गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. राऊत यांच्या संघाने नाणेफेक जिंकली. सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष राऊत यांचा संघ आघाडीवर होता. मात्र दुसर्‍या सत्रात शिंदे यांच्या संघाने आक्रमक खेळ केला. पण नगराध्यक्षांच्या संघाने मंत्री महोदयांच्या संघावर मात केली.

नगराध्यक्ष राऊत संघाने 21, तर पालकमंत्री संघाने 16 गुण मिळविले. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी उत्कृष्ट खेळी करुन शिंदे यांच्या संघावर मात केली.

राम शिंदे यांच्या संघात शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बापूराव तोरडमल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, क्रीडाशिक्षक सुनील नेवसे, रेल्वे अधिकारी प्रशांत पाटील, गणेश जेवरे, शिवाजी धांडे, प्रकाश धांडे, राजेंद्र खराडे यांचा समावेश होता.

तर नगराध्यक्ष संघात रावसाहेब गरड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, चापडगावचे सरपंच आप्पासाहेब घनवट, सचिन धोदाड, राम ढेरे, अनिल गदादे, व्यापारी अभय बोरा यांचा समावेश होता.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: minister ram shinde pea
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV