बळीराजा चेतना योजनेच्या निधीचा गैरवापर

Misuse of Baliraja Chetna Yojna’s fund latest updates

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार फक्त घोषणा करतं आणि त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही, याचं अजून एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या बळीराजा चेतना योजनेत दिलेला निधी वापरला गेला नाही. आणखी धक्कादायक म्हणजे याच योजनेचा निधी एका जिल्ह्यात तर वेगळ्याच कारणासाठी वापरला गेल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सरकारसाठी कळीचा विषय आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात जास्त आत्महत्या होतात, त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2015 मध्ये बळीराजा चेतना योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली. पण योजनेसाठी दिलेल्या निधीचा वापर हा शेतकऱ्यांसाठी कमी झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, या योजनेतील 3 कोटीहून अधिक खर्च जाहिरात, बॅनर्स, डॉक्युमेंट्री फिल्म, कार्यालयांसाठी खर्च झाल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव इथून इस्त्राईलला अभ्यास दौरा गेला, त्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले.

शेतकरी आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी अभ्यास दौऱ्यावर पैसे खर्च झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात निकषात बसत नाही म्हणून 237 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत नाकारली आहे आणि दुसरीकडे बळीराजा योजनेतील निधी योग्य कामासाठी वापरला जात नाही.

यवतमाळ जिल्ह्यात 34 हजार 596 कुटुंबांना या योजनेखाली मदतीसाठी निवडण्यात आलं होतं. 1 हजार 848 गावात समित्या नेमण्यात आले, असं असूनही शेतकरी आत्महत्या थांबल्याच चित्र नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात तर दिलेला निधी खर्चच करण्यात आला नाही. या जिल्ह्यात 23 कोटी 40 लाख निधी पैकी फक्त 10 कोटी 76 लाख निधी वापरण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्यांवर मुंबईतील TISS या संस्थेला अभ्यास करण्यासाठी पण निधी दिला गेला. खरंतर TISS ला निधी देण्याची आवश्यकता नव्हती.

शेतकऱ्यांसाठी सरकार नुसतं घोषणा करतं, पण त्या योजना कशा राबवायची हे यंत्रणेला माहित नाही किंवा दिलेला निधी हा योग्य कामासाठी वापरला जात. निधी पडून राहतो हे चित्र वारंवार दिसून येतं. या योजना आखूनही शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी का पडत याच उत्तर यामध्ये आहे.

राज्य सरकार नुसतं लोकप्रिय घोषणा करतं, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात, तिथवर काहीच पोहोचत नाही, हे विदारक चित्र बळीराजा योजनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Misuse of Baliraja Chetna Yojna’s fund latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

मुंबई : आगामी दोन वर्षात राज्यातील ऊस पिकाखालील 3 लाख 5 हजार हेक्टर

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल, तर त्यासाठी ठिबक सिंचन

आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?
आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?

मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज
येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017

  गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची

तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज
तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा

वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार
वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार

वर्धा: शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध

राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी
राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही...

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या

कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश
कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश

मुंबई : कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय

लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री
लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात