आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.

आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

मुंबई : जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.

प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.

प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते.

काय आहे प्रकरण?

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.

“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :


..तोपर्यंत परिचारकांना निलंबित करु : चंद्रकांत पाटील

परिचारकांचं निलंबन करा, विधानपरिषदेत सर्वपक्षीयांची मागणी

सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे

आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली

‘ते’ वक्तव्य अनवधानानं निघालं’, परिचारकांचा माफीनामा

आमदार प्रशांत परिचारकांना महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV