मुख्यमंत्री म्हणजे सोज्वळ चेहरा, राज्याच्या दैवतासारखं काम करतात : लाड

भाजपमध्ये आल्यावर बाहेरच्या कार्यकर्त्यांना वाव मिळत नसल्याचे लोक म्हणतात, पण मला मुख्यमंत्र्यांनी मान सन्मान देऊन राज्याचा उपाध्यक्ष केल्याचं म्हटलं.

मुख्यमंत्री म्हणजे सोज्वळ चेहरा, राज्याच्या दैवतासारखं काम करतात : लाड

अहमदनगर : भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोज्वळ चेहरा असून राज्याचं दैवत म्हणून काम करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

“मुख्यमंत्री राज्याचं दैवत म्हणून काम करत असून त्यांचा सोज्वळ चेहरा आहे. यामुळे आम्ही मुंबई महापालिकेत मोठी आघाडी घेतली. मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे. राज्यातील शेती, पाणी, वीज, मराठा आणि धनगर आरक्षणासह शहर आणि ग्रामीण विकासावर लढत आहेत. 2019 पर्यंत मुख्यमंत्र्यांना राज्यात बदल करायचा असून येत्या निवडणुकीत 160 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”, असा दावा लाड यांनी केला.

त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरच मुंबई महापालिकेत मोठं यश मिळालं आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांमधील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, शेकाप, समाजवादी, बहुजन विकास आघाडी आणि एमआयएमने मतदान केल्याचा गौप्यस्फोट केला. तर येत्या निवडणुकीत 160 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.

अहमदनगरमधील पाथर्डीत ते हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठाच्या तिसगाव शाखेच्या सत्कार समारंभात बोलत होते. लाड हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

यावेळी बोलताना लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. भाजपमध्ये आल्यावर बाहेरच्या कार्यकर्त्यांना वाव मिळत नसल्याचे लोक म्हणतात, पण मला मुख्यमंत्र्यांनी मान सन्मान देऊन राज्याचा उपाध्यक्ष केल्याचं म्हटलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MLC Prasad Lad praised CM Devendra Fadnavis latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV