सांगलीत मनसैनिकांचा राडा, परप्रांतीयांना चोपलं

सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी काल संध्याकाळी मनसे सैनिकांनी तुफान राडा घालत परप्रांतीयांना चोपलं. एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत हा प्रकार घडला.

MNS workers beat up non-Maharashtrians in Sangli

फोटो सौजन्य : एएनआय

सांगली : सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी काल संध्याकाळी मनसे सैनिकांनी तुफान राडा घालत परप्रांतीयांना चोपलं. एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत हा प्रकार घडला.

सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील विविध कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये 20 ते 25 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय काम करतात. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ते नेहमी कुपवाड बाजारात येतात. काल संध्याकाळी दैनंदिन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत आले असता, मनसे सैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

 


मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप करत, परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावाही सावंत यांनी केला.

याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुपवाड शहर प्रमुख विनय पाटील यांचाही समावेश आहे. तर मनसेचे पदाधिकारी आणि इतर तरुणांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात परिसरातून 16 पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या घटनांपाठीमागे परप्रांतीयच असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:MNS workers beat up non-Maharashtrians in Sangli
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

अहमदनगर:  या पेटीत मगर आहे
अहमदनगर: या पेटीत मगर आहे

अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं.

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं
एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं

सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण

नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी

धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी
धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी

धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या

आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन
आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन

साक्री (धुळे) : गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या ‘श्री पांझरा कान

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल
उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? :...

मुंबई : एसटी संपाचा आजचा तिसरा दिवस असून, कर्माचाऱ्यांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

"एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा"

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. अद्यापही