मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य

गडचिरोली येथील आयोजित कुणबी समाज मेळाव्यात त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य

गडचिरोली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. त्यांनी जनतेला खोटे आश्वासनं देऊन सत्ता मिळवली'', असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. गडचिरोली येथील आयोजित कुणबी समाज मेळाव्यात त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

''भाजपने निवडणुकीत स्वामिनाथन समितीची शिफारस लागू करण्याचं आश्वासन दिले होतं, मात्र आश्वासन अजूनही पूर्ण केलं नाही. लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिलं जात नव्हतं'', असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

''मोदींनी 2001 पासून गुजरातमध्ये ओपन गटातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी तेली दाखवून लोकसभा निवडणूक लढवली. मोदी हे तेली, कुणबी आणि ओबीसीही नाहीत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही'', असं लक्षात आल्यानंतरच भाजपशी विद्रोह करुन खासदारकीचा राजीनामा दिला, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.

बातमीचा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Modi is fake OBC nana patole’s statement
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV