वाशिममध्ये जखमी वानराला अमानुष मारहाण, तिघे वन विभागाच्या ताब्यात

जखमी वानराला वानराला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. शनिवारी रात्री उशिरा वन विभागाने ही कारवाई केली आहे.

वाशिममध्ये जखमी वानराला अमानुष मारहाण, तिघे वन विभागाच्या ताब्यात

वाशिम : जखमी वानराला वानराला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. शनिवारी रात्री उशिरा वन विभागाने ही कारवाई केली आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना कालच समोर आली होती. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं.

तसंच या वानराच्या मृत्यूनंतर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली आणि शिव्याही दिल्या. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रिकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले.

पवन बांगर असं वानराला मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून, त्य़ाच्यावर कारवाईची मागणी होत होती. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नसला तरीही वनविभागानं मारहाण करणाऱ्या आणि त्याचं चित्रिकरण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

वाशिममध्ये माणुसकीला काळिमा, जखमी वानराला अमानुष मारहाण

पाहा व्हिडीओ  

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: monkey hitted by man got in custody of forest dept in washim latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV