कोल्हापुरात खासगी बसला आग, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू

गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाच्या हद्दीत पहाटे 4.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रॅव्हल्स ही बस गोव्यावरुन कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला होती निघाली.

कोल्हापुरात खासगी बसला आग, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरात आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून 16 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाच्या हद्दीत पहाटे 4.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रॅव्हल्स ही बस गोव्यावरुन कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला होती निघाली.

एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसला भीषण आग लागली आणि  काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी बसमधील दोन प्रवासी 90 टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत प्रवासी पुण्याचे असून बंटी भट आणि विकी भट अशी त्यांची नावं आहेत.
Kolhapur_Bus_Fire_1
तर आग लागल्याची बाब ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर त्याने प्रवाशांना बाहेर ओढून काढलं. बाहेर पडताना अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले.

शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर या सुरक्षित बाहेर काढलेल्या प्रवाशांची व्यवस्था कळे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Moving AC bus catches fire in Kolhapur, two passengers dead
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV