MPSC घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रबोध राठोडकडे कोट्यवधी

बळवंत भातलवंडे याने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे.

MPSC घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रबोध राठोडकडे कोट्यवधी

नांदेड : डमी उमेदवार बसवून एमपीएससी परीक्षेत सरकारी पदं लाटणाऱ्या घोटाळ्यात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याइतका मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे 2007 ते 2016 अशा दहा वर्षांच्या कालावधीत हा घोटाळा झाला आहे.

घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रबोध राठोडकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे. राठोडकडे इनोव्हा स्कॉर्पिओ अशा दहा वेगवेगळ्या प्रकारच्या गाडया आहेत. आपली आई बहीण पत्नी मुलगा यांच्या नावानं प्रबोधने एलआयसीच्या 43 पॉलिसी घेतल्या आहेत. तो पंधरा लाखाचा वार्षिक प्रिमियम भरतो.

विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने नांदेड जिल्ह्यातील किनवट कोर्टात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. प्रबोध राठोड याच्यासह नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, बळवंत भातलवंडे याला अटक केली आहे.

भातलवंडे याने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे. त्याच्यामुळे 16 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. या प्रत्येक परीक्षेसाठी बळवंतला 50 हजारांपासून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली

आरोपपत्राच्या नऊशे पानांच्या प्रती एबीपी माझाने मिळवल्या आहेत. या आरोपपत्राच्या तपशीलातून सरकारच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून त्यांना उत्तीर्ण करुन देणाऱ्या रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करायचं ठरवल्यास हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापमं घोटाळ्यात एवढा मोठा घोटाळा आहे.

प्रबोधने मूळ विद्यार्थी आणि डमी विद्यार्थ्यांच्या सह्या जुळाव्यात, यासाठी परीक्षा देणाऱ्यांच्या कार्यशाळाही घेतल्या. डमी उमेदवारांना पाच लाख रुपये मिळत होते

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MPSC Scam matermind Prabodh Rathod has wealth worth crores latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV