मुंबई-शिर्डी विमानाची चाचणी, राम शिंदेंसह पहिल्या विमानाचं उड्डाण

जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झालं आहे

मुंबई-शिर्डी विमानाची चाचणी, राम शिंदेंसह पहिल्या विमानाचं उड्डाण

शिर्डी : मुंबई-शिर्डी विमानसेवेची पहिली उड्डाण चाचणी आज होणार आहे. शिर्डीसाठी झेपावणाऱ्या विमानातून अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे उड्डाण करणार आहेत. रविवारी एक ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानसेवेचं लोकार्पण होणार आहे.

जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झालं आहे. दुपारी तीन वाजता सांताक्रुझ विमानतळावरुन अलायन्स एअरवेजचं विमान शिर्डीसाठी उड्डाण करेल. 3.35 वाजता हे विमान शिर्डी विमानतळावर लँड होईल.

साईभक्तांना खुशखबर, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं


त्यानंतर शिर्डीत विमानतळ तपास आणि विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात येईल. एक तारखेपासून सुरु होणाऱ्या साईबाबा समाधी उत्सवाच्या बैठकीलाही राम शिंदे हजेरी लावणार आहेत. परवानगी मिळाल्यानंतर पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर शिर्डीहून विमानाचं उड्डाण होईल.

भविष्यात रात्रीच्या वेळीही विमानाचं उड्डाण करण्याची योजना आहे. नवी दिल्ली, हैदराबाद विमानतळांसोबत शिर्डी विमानतळ जोडण्यात येणार आहे. शिर्डीत रोज 80 हजार साईभक्तांची ये-जा सुरु असते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV