कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून मुंबईसाठी विमानसेवा

मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमान सेवेतून 30 प्रवासी उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.

कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून मुंबईसाठी विमानसेवा

कोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आता उद्यापासून (मंगळवार) सुरु होणार आहे. मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.

कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर - मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.

मुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai to Kolhapur and Kolhapur to Mumbai air travel to start from tomorrow
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV